सोयाबीन लागवड
by 𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
🗂️ Education
Features सोयाबीन लागवड
सोयाबीन लागवड कशी कधी करावी सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञान लागवड माहिती व्यवस्थापन आपण उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.सोयाबीन हे कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते.
सोयाबीन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे.
त्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
तसेच सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणूनही ओळखले जाते.
सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे प्रामुख्याने सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात केली जाते.
एकूण प्रथिनांपैकीं ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून तयार होतात.सोयाबीन पिकाचा घेतल्यानंतरच राहिलेला उर्वरित भाग हा जनावरांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.
सोयाबीनपासून बिस्कीट , सोयामिल्क, सोयावडीसारखे १०० उपपदार्थ तयार करता येतात .
त्याचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
सोयाबीनला हे पीक फायदा देणार आहे.Contents hide 1 हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती2 सोयाबीनची उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय –2.1 कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.3 सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी च्या महत्वाच्या बाबी –3.1 सुधारित वाण/सोयाबीन नवीन जाती –3.2 जमीन –3.3 हवामान –4 सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी?4.1 सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी?4.2 सोयाबीनमध्ये आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात?5 सोयाबीन खत व्यवस्थापन5.1 कोबी खत आणि फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक5.2 सोयाबीन आंतरमशागत –5.3 Share this:5.4 Related हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहितीसोयाबीनची उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय –बीजप्रक्रिया करणे.सुधारीत जातींची बियाणे वापरावीत.योग्य खत मात्रांचा वापर करणे.आधुनिक लगवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.दर हेक्टरी झाडांची संख्या राखणे.आंतरपीक पद्धतींचा वापर करणे.कीड व रोगांचा आणि तण यांवर वेळेवर बंदोबस्त करणे.
कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी च्या महत्वाच्या बाबी –सुधारित वाण/सोयाबीन नवीन जाती –एम.ए.सी.एस.११८८,टीए.एम.एस.९८-२१,एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.४५०, एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,सोयाबीनची उगवण्याची शक्ती ७० टक्केच्या वर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरून पेरावे.जमीन –सोयाबीनच्या लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी, गाळाची जमीन उत्तम ठरते.
हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते .पाणी साठून राहणाऱ्या जमिनीतीत सोयाबीनचे पीक चांगले येत नाही.
सोयाबीन लागवडीच्या जमिनीचा PH ६ ते ६.५ च्या आसपास असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक अधिक उत्तम येते.
म्हणून या सर्व गोष्टीचा विचर करून सोयाबीन पिकासाठी जमीन निवडावी.हवामान –सोयाबीन पिकास उष्ण हवामान आणि तापमान साधारणतः १८ ते ३५ अंश से.ग्रे.
या पिकास अनुकूल ठरते आणि पिकाची वाढ चांगली होते.
सोयाबीन पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी.
पावसाची गरज असते.
उन्हाळी तीळ, मूग ,उडीद लागवड व्यवस्थापनसोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी?पेरणीपूर्वी जमीन खोल नांगरुन चांगली भुसभुशीत करावी.
त्यानंतर त्यामध्ये चांगलं कुजून गेलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापराव्या .सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी?सोयाबीन पिकाची १५ जून ते १५ जुले च्या दरम्यान पेरणी करावी.
सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते.
सोयाबीन बियाणे ४५ x ५ सें.मी.
अंतरावर पेरावे.
पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सें.मी.
पेक्षा जास्त खोल जाणार नाही, हि काळजी घेऊन पेरणी करावी.
वाफशावर पेरणी योग्य ठरेल, तसेच सोयाबीन बियाणांची उगवण झाल्यावर शक्य असल्यास गरजेनुसार पाणी द्यावे.सोयाबीनमध्ये आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात?सोयाबीन पिकामध्ये ५ प्रकारे आंतरपीक पद्धतीचा वापर करू शकतो.
त्या पद्धती खालीलप्रमाणे असणार आहेत.सोयाबीन आणि तूर यांची पेरणीसोयाबीन आणि कपाशी यांची पेरणीसोयाबीन आणि ज्वारी यांची पेरणीसोयाबीन आणि भुईमूग यांची पेरणीसोयाबीन आणि बाजरी यांची पेरणी
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the सोयाबीन लागवड in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above